Alandi News: पूर्ववैमनस्यातून एकाला मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

आरोपींनी रविवारी रात्री अकरा वाजता फिर्यादी रोहिदास यांना लोखंडी पाईपने डोक्यात, हातावर आणि पायावर मारहाण केली. यात रोहिदास यांना गंभीर दुखापत झाली आहे.

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी मिळून एकाला पाईपने मारहाण केली. ही घटना रविवारी (दि.9) रात्री अकरा वाजता चिंबळी दत्तनगर येथे घडली.

रोहिदास बाबासाहेब बनकर (वय 32, रा. चिंबळी दत्तनगर, ता. खेड) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गौरव भूमकर, प्रशांत भूमकर (दोघे रा. चिंबळी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहिदास बनकर आणि आरोपी यांचे मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणांवरून भांडण झाले होते. त्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी रविवारी रात्री अकरा वाजता फिर्यादी रोहिदास यांना लोखंडी पाईपने डोक्यात, हातावर आणि पायावर मारहाण केली. यात रोहिदास यांना गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.