Indian Flag To be hoisted In Times Square: पहिल्यांदाच न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअर येथे तिरंगा फडकणार

For the first time, the indian tricolor will be hoisted at Times Square in New York अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या राम मंदिराच्या भूमी पूजनाच्या दिवशी न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरमधील बिलबोर्डवर प्रभू राम आणि भव्य राम मंदिराचा थ्री डी फोटो प्रदर्शित करण्यात आला होता.

एमपीसी न्यूज – अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या राम मंदिराच्या भूमी पूजनाच्या दिवशी न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरमधील बिलबोर्डवर प्रभू राम आणि भव्य राम मंदिराचा थ्री डी फोटो प्रदर्शित करण्यात आला होता. त्यांनंतर आता अमेरिकेतील एका समूहाने 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरवर तिरंगा फडकावणार असल्याची घोषणा केली आहे. ‘एबीपी माझा’ने हे वृत्त दिले आहे.

तीन राज्य न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि कनेक्टिकट येथील फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशनने (एफआयए) एका वृत्त वाहिनीशी बोलताना असे सांगितले की, टाइम्स स्क्वेअरवर पहिल्यांदा तिरंगा फडकवून 15 ऑगस्ट 2020 रोजी इतिहास रचण्यात येणार आहे.

या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये भारताचे वाणिज्य दूत रणधीर जायसवाल ध्वजारोहण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.

दरम्यान, अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या राम मंदिराच्या भूमी पूजनाच्या दिवशी न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरमधील बिलबोर्डवर प्रभू राम आणि भव्य राम मंदिराचा थ्री डी फोटो प्रदर्शित करण्यात आला होता.

नॅस्डेक स्क्रीन व्यतिरिक्त 17,000 चौरस फूट एलईडी स्क्रिनवर थ्रीडी फोटों प्रदर्शित केले गेले होते. दरम्यान, टाइम्स स्क्वेअरवर लावण्यात आलेला बिलबोर्ड जगातील सर्वांत मोठा आणि आकर्षक बिलबोर्ड पैकी एक आहे. तसेच पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.