गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022

Alandi Power cut : आळंदी शहर अंधारात, उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडीत

एमपीसी न्यूज : आळंदी येथील तुळजा भवानी मंदिरा समोरील भूमी अंतर्गत असणारी मुख्य विद्युत वाहनी केबल ही नवरात्र मंडपाचे काम चालू असताना कट झाली.(Alandi Power cut) याची माहिती तेथील विद्युत कर्मचाऱ्यांने सांगितली. तसेच याबाबतची माहिती सोशल मीडिया ग्रुपवर पोस्ट करण्यात आली आहे.

Ghotawade Grampanchayt : रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या टेम्पो चालकाकडून एक लाख रुपयांचा दंड वसूल

विद्युत वहिनी ची मेन केबल कट झाल्यामुळे गावठाण परिसर,चाकण चौक,प्रदक्षणा रस्ता,वडगांव रस्ता,पद्मावती रस्ता,दत्त मंदिर परिसर,मरकळ रस्ता इ. विविध भागात रात्री उशिरा पर्यंत वीज पुरवठा बंद होता. रात्री उशिरा पर्यंत वीज पुरवठा बंद असल्याने या परिसरात सर्वत्र अंधार पसरला होता.(Alandi Power cut) तेथील कर्मचाऱ्यांचे काम युद्ध पातळीवर चालू असल्याचे दिसून येत होते.दि.22 रोजी सकाळ पासून  रात्री उशिरा पर्यंत वीज पुरवठा बंद असल्याने स्थानिक नागरिकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. काही भागात रात्री वीज पुरवठा, चालू बंद होत होता.

 

spot_img
Latest news
Related news