Akurdi : अजित पवार यांच्या हस्ते ‘मनोविज्ञान बालकांचे’ पुस्तकाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या आकुर्डी येथील श्री म्हाळसाकांत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील समुपदेशक तथा ज्येष्ठ शिक्षिका संगीता चंद्रकांत निंबाळकर लिखित ‘मनोविज्ञान बालकांचे’या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कदम, खजिनदार अॅड.मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव, प्राचार्य ए. एम. शेख यांच्यासह आजी माजी प्राचार्य व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘मनोविज्ञान बालकांचे’ हे वेगळ्या धाटणीचे पुस्तक असून ते संग्रही ठेवण्यासारखे आहे. या उपयुक्त पुस्तकाच्या निर्मितीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लेखिका संगीता निंबाळकर यांचे कौतुक केले.

या पुस्तकात विद्यार्थ्यांचे मनोविज्ञान यावर लेखन केले असून विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या समस्या, कारणे, उपाय यावर प्रकाशझोत टाकला आहे.
अध्ययन अक्षमता, वर्तन समस्या, नैराश्य, मतिमंदत्व, विघातक वर्तन विकृती, बालक शोषण आदी ज्वलंत समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे. लेखिका निंबाळकर या शिक्षण क्षेत्रातील तज्ञ म्हणून ओळखल्या जात असून गेली अनेक वर्षे संस्थेत समुपदेशनाचे काम करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.