Maharashtra News : अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, यावेळी या मागण्या आहेत

एमपीसी न्यूज : माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चौथ्यांदा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन केंद्रीय कृषी मंत्रालयाने तयार केलेल्या प्रस्तावाचे प्रारूप सादर केले. मात्र, हजारे यांचे समाधान झाले नाही. आपण उपोषणाच्या निर्णयावर ठाम असून 30 जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथील संत यादवबाबा मंदिरात उपोषण सुरू करणार असल्याचे हजारे यांनी स्पष्ट केले.

दोन वर्षांपूर्वी शेतकरीहिताच्या मागण्यांसंदर्भात विचार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे लेखी आश्वासन केंद्र सरकारने दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. चर्चा आणि आश्वासनात वेळ घालविण्यापेक्षा शेतकरीहिताच्या मागण्यांसंदर्भात त्वरित निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा हजारे यांनी व्यक्त करून आपण 30 जानेवारीपासून उपोषण सुरू करणार असल्याचे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.