Pune News : विसर्जनाच्या काळात अखंडित वीजपुरवठ्यासाठी नियंत्रण अधिकाऱ्याच्या नेमणूका

एमपीसी न्यूज – गणेशोत्सव विसर्जनाच्या काळात विजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणने तयारी केली असून यासाठी अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

प्रत्येक विभागातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असून त्याच्या मदतीला तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आलेल्या आहेत.त्यामुळे विसर्जन काळात विजेसंबंधी असणाऱ्या तक्रारीची त्वरित दख्खल घेतल्या जाणार आहे.

नियंत्रण अधिकारी यांची माहिती संबंधित पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आलेली असून मिरवणूक विसर्जन मार्गावर तांत्रिक कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे.सोबतच गणेशोत्सव मंडळांनी वीज सुरक्षतेबाबत खबरदारी घ्यावी, अशी महावितरणने विनंती केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.