Pimpri Corona Update : कोरोनामुळे एकाचा मृत्यू; शहरात आज 60 नवीन रुग्णांची नोंद; 56 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड शहराच्या विविध भागातील 60 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरूवारी) नोंद झाली.तर, कोरोनामुक्त झालेल्या 56 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, मागील चोवीस तासात कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला.आजपर्यंत शहरातील 4 हजार 629 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.शहरातील 3 लाख 70 हजार 508 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली.सध्या 461 सक्रिय रुग्ण शहरात आहेत.त्यातील 450 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

तर, 11 रुग्ण महापालिका रुग्णालयामध्ये दाखल आहेत.आज दिवसभरात 1 हजार 726 नागरिकांचे लसीकरण झाले.आजपर्यंत 37 लाख 59 हजार 679 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.