Pune News : मनपा सेवकांच्या गणवेश दरांना मान्यता

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गणवेश आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी दरांना स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, महापालिकेच्या मान्य गणवेश नियमावलीनुसार तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना गणवेश आणि इतर साहित्य खरेदीसाठी या दरांनुसार रोख स्वरुपात त्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. सेवक, निरीक्षक, शिपाई, वाहनचालक, सुरक्षारक्षक, रखवालदार आदी सेवकांना गणवेश दिले जातात. गणवेशासह बूट, चप्पल, सॅण्डल, हॅण्डग्लोज, गमबूट, हेल्मेट, मास्क, रेनकोट, सेफ्टी गॉगल, जंतुनाषक साबण, ऑफीस बॅग आदी साहित्याचा आवश्यकतेनुसार समावेश केला जातो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.