Pune News : कमला नेहरु रुग्णालयाच्या आयसीयूत वातानुकूलीत यंत्रणा

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या कमला नेहरु रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) वातानुकूलीत यंत्रणा बसविण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, महापालिकेच्या कमला नेहरु रुग्णालयात महापालिकेचा पहिलाच अतिदक्षता विभाग विकसित करण्यात येत आहे. महापालिकेच्या रुग्णालयात सर्वसामान्य आणि गरीब रुग्णांना तातडीचे आणि अतिदक्षता विभागातील उपचारांची सुविधा उपलब्ध होणार आहे. या अतिदक्षता विभागासाठी आवश्यक असणारी वातानुकूलीत यंत्रणा बसविण्यासाठी स्थायी समितीने सुमारे 34 लाख 15 हजार रुपयांच्या निविदेला मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.