Pune News : कोथरुड बालनाट्यगृहात विविध विकासकामे

एमपीसी न्यूज – कोथरुड येथे नव्यान बांधण्यात येणाऱ्या बालनाट्यगृहात मल्टिलेव्हल पार्किंगवरील पोडियम व सभागृह इत्यादी विकासकामे करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, विविध विकासकामांसाठी 3 कोटी 10 लाख 82 हजार रुपयांच्या निविदेला मान्यता देण्यात आली. सुमारे 38 लाख रुपये जीएसटी, 1 लाख 58 हजार रुपये रॉयल्टी चार्जेस आणि 32 हजार रुपये मटेरियल टेस्टिंग शुल्कापोटी अदा करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.