ARAI : वाहन उद्योग क्षेत्रात परिवर्तन आणायचे असेल तर सर्वसमावेशक दृष्टीकोन गरजेचा – डॉ. एन सर्वानन

एआरएआयच्या वतीने 18 व्या सिम्पोजियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नोलॉजी (सिॲट 2024) चा समारोप

एमपीसी न्यूज – वाहन उद्योग क्षेत्र हे नजीकच्या काळात वेगाने बदलणारे क्षेत्र असून यामध्ये ( ARAI ) परिवर्तन आणायचे असेल तर केवळ उत्पादनावर लक्ष केंद्रित करून चालणार नाही. उत्पादनासोबतच सुरक्षितते संदर्भातील संवेदनशील दृष्टीकोन, ग्राहककेंद्री पर्याय उपलब्ध करून देण्याचे ध्येय, आवश्यक बाबींची पुरवठा साखळी आणि कुशल मनुष्यबळ आदी बाबींचा अंतर्भाव असलेला सर्वसमावेशक दृष्टीकोन गरजेचा आहे. याच जोरावर वाहन उद्योग क्षेत्रासाठी समग्र परिसंस्था घडविता येणे शक्य असल्याचे प्रतिपादन एआरएआयचे अध्यक्ष डॉ एन सर्वानन यांनी केले.

भारतीय वाहन उद्योगाची नियामक संस्था असलेल्या ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या   18 व्या सिम्पोझियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नोलॉजी अर्थात सिॲट 2024 च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. एआरएआयचे संचालक डॉ. रेजी मथाई, एआरएआयचे वरिष्ठ उपसंचालक व सिॲटचे निमंत्रक विक्रम शिंदे आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

वाहन उद्योग क्षेत्रातील तंत्रज्ञानाशी संबंधित सिॲट 2024  ही द्विवार्षिक परिषद मोशी येथील पुणे इंटरनॅशनल एक्सिबिशन अँड कन्व्हेंशन सेंटर (पीआयईसीसी) येथे मागील तीन दिवस सुरू होती. प्रगतीशील गतिशीलतेच्या दिशेने परिवर्तन’ (ट्रान्सफॉर्मेशन टूवर्डस प्रोग्रेसीव्ह मोबिलिटी) ही यावर्षीच्या परिषदेची संकल्पना होती. वाहन उद्योग क्षेत्रातील नामवंत अशा जागतिक तज्ज्ञांच्या सहभागासह या क्षेत्राशी संबंधित विचारांची देवाणघेवाण आणि विचारमंथन या ठिकाणी तीन दिवस झाले.

Today’s Horoscope 28 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

परिषदेच्या समारोप कार्यक्रम दरम्यान एआरएआय – मार्ग 2.0 अर्थात मेजरमेंट अँड ॲनालिसिस ऑफ रोड जॉमेट्री या डाटाबेसचे अनावरण देखील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. परिषदेदरम्यान उभारण्यात आलेले स्टॉल्स, सादर झालेले संशोधन पेपर्स आणि खास विद्यार्थ्यांची पोस्टर स्पर्धा यांचे बक्षीस वितरण देखील करण्यात ( ARAI ) आले.

वाहन उद्योग क्षेत्रासाठी शाश्र्वत पर्याय उपलब्ध करून देत असताना देशकल्याणाचा उद्देश असायला हवा असे सांगत डॉ सर्वानन पुढे म्हणाले की, “कोणत्याही उत्पादनाची निर्मिती करताना सुरक्षितते संदर्भात संवेदनशील दृष्टीकोन असणे महत्त्वाचे आहे. पर्यायी इंधनांवर काम करीत असताना आयात कमी करण्यावर आपण भर द्यायला हवा. आणि म्हणूनच शाश्र्वत पर्यायांसाठी  एका उत्पादनावर अवलंबून न राहता सर्वसमावेशक दृष्टीकोन आणि समग्र परिसंस्था उभारण्यावर आपण भर द्यायला हवा.”

या सर्व गोष्टीं करीत असताना कुशल मनुष्यबळ हे अत्यंत महत्त्वाचे असून एआरएआय सारख्या संस्थांनी कुशल मनुष्यबळ निर्मितीत प्रशिक्षणात्मक कार्यक्रम राबवावेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

तीन दिवसीय परिषदेतील महत्वाचे मुद्दे सांगताना डॉ रेजी मथाई म्हणाले, “सिॲट 2024 दरम्यान तांत्रिक तज्ज्ञांनी प्रामुख्याने ई-मोबिलिटी, सिम्युलेशन आणि मॉडेलिंग, उत्सर्जन मापन आणि नियंत्रण तंत्रज्ञान, प्रगत वाहन गतिशीलता, अॅक्टिव्ह व पॅसिव्ह सेफ्टी, आवाज, कंपन आणि हार्शनेस अर्थात कठोरता (एनव्हीएच), हायड्रोजन फ्युएल सेल आणि हायड्रोजन आय सी इंजिन, चाचणी आणि मूल्यमापन, स्ट्रक्चरल ( ARAI ) विश्वसनीयता, प्रगत ड्रायव्हर सहाय्य प्रणाली (ADAS), पर्यायी इंधन, आयटीएस आणि नियमन, टायर तंत्रज्ञान व साहित्य आणि उत्पादन या वाहन उद्योगाशी संबंधित विषयांवर उहापोह केला. याद्वारे भविष्यातील तंत्रज्ञानावर अपेक्षित चर्चा झाली याचा आनंद आहे.

नजीकच्या भविष्यात शून्य उत्सर्जन ध्येयाचा पाठलाग करीत असताना तंत्रज्ञानाची कास कशी धरता येईल याचाही अंदाज यामुळे सहभागी झालेल्या सर्वांना आला.” वाहन उद्योग क्षेत्रात काय होणार आहे याची कल्पना सहभागी सर्वांना आली असेल अशी आशा यावेळी डॉ मथाई यांनी व्यक्त केली.

यावर्षी तीन दिवसीय सिॲट परिषदेमध्ये 210 हून अधिक तांत्रिक पेपर्स प्रदर्शित झाले. याबरोबरच जागतिक तज्ज्ञ व मान्यवरांनी वाहन उद्योगाशी संबंधीत विषयांवर मार्गदर्शन देखील केले.

सिॲट अंतर्गत झालेल्या परिसंवादांमध्ये 1500 हून अधिक वाहनउद्योग क्षेत्रातील तंत्रज्ञ सहभागी झाले. 9 देशांतील तांत्रिक तज्ज्ञांनी 48 तांत्रिक सत्रांमध्ये त्यांचे संशोधनकार्य येथे सादर केले आणि चर्चा देखील केली.  याव्यतिरिक्त सिॲटच्या संकल्पनेवर विविध चर्चासत्रांचे आयोजन देखील करण्यात आले होते.

परिषदे दरम्यान होणाऱ्या एक्स्पोमध्ये वाहन उद्योग क्षेत्रातील जागतिक पातळीवरील सर्व कंपन्यांना आपली उत्पादने, तंत्रज्ञान, नवकल्पना आणि सेवा प्रदर्शित केल्या. या वर्षीच्या एक्स्पोमध्ये जागतिक दर्जाच्या 170 कंपन्यांचे तब्बल 340 स्टॉल्स होते ज्यामध्ये ऑटोमोटिव्ह ओईएमस, टीअर I, टीअर II आणि टीअर Ill पुरवठादार, स्टार्ट-अप, उपकरणे निर्माते, सीएई टूल प्रोव्हायडर्स, तंत्रज्ञ, अभियांत्रिकी सेवा प्रदाते, डिझाईन हाऊसेस आणि टेस्ट एजन्सीज यांसाठी त्यांची उत्पादने, तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात आले होते.

याशिवाय प्रात्यक्षिक क्षेत्रासह असलेले फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी पॅव्हेलियन, मध्यम लघु स्केल स्टार्ट-अप पॅव्हेलियन आणि लाईव्ह अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम्स (ADAS) यावर्षीच्या सिॲटचे प्रमुख आकर्षण ( ARAI ) ठरले.

https://www.youtube.com/watch?v=YiCGH33SdwQ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.