Pune Lonavala Local : पुणे -लोणावळा सेक्शनवर आज ब्लॉक; 12 लोकल रद्द

एमपीसी न्यूज – मध्य रेल्वेच्या पुणे विभागाद्वारे पुणे-लोणावळा सेक्शनवर  इंजीनियरिंग आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता ( Pune Lonavala Local ) आज  (दि. 28) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  पुणे लोणावळा मार्गावरील बारा लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

ARAI : वाहन उद्योग क्षेत्रात परिवर्तन आणायचे असेल तर सर्वसमावेशक दृष्टीकोन गरजेचा – डॉ. एन सर्वानन

पुणे – लोणावळा दरम्यान रद्द लोकल

पुण्याहून लोणावळा साठी 09.57 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01562 रद्द राहील.

पुण्याहून लोणावळा साठी 11.17 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01564 रद्द राहील.

पुण्याहून लोणावळा साठी 15.00 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01566 रद्द राहील.

शिवाजीनगरहून तळेगाव करीता 15.47 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01588 रद्द राहील.

पुण्याहून लोणावळा साठी 16.25 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01568 रद्द राहील.

शिवाजीनगर वरून लोणावळा करीता 17.20 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01570 रद्द राहील.

लोणावळा – पुणे दरम्यान रद्द लोकल

लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता 10.05 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01559 रद्द राहील.

लोणावळ्याहून पुणे साठी  14.50 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01561 रद्द राहील.

तळेगाव येथून पुणे साठी 16.40 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01589 रद्द राहील.

लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता 17.30 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01565 रद्द राहील.

लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी 18.08 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01567 रद्द राहील.

लोणावळ्याहून पुण्यासाठी 19.00 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01569 रद्द राहील.

मेल/एक्सप्रेस ट्रेनचे रेग्युलेशन:-

गाडी  क्रमांक 12164 एमजीआर चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस सेक्शन मध्ये 03.30 तास रेग्युलेट ( Pune Lonavala Local ) करण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.