Bhosari: तुमची वास्तू सुंदर, सुशोभित करण्यासाठी चामुंडा मार्बल्स आणि टाईल्स सदैव तत्पर

article on bhosari's chamunda marbles and tiles ग्राहकांचे घरासंबंधीत वस्तू खरेदीसाठी पहिल्या पसंतीचे हे ठिकाण आहे. या ठिकाणी सर्व प्रकारचे मार्बल्स, ग्रेनाइड टाईल्स, सीपी, सॅनिटरी वेअर्स तसेच मागणीनुसार इटालियन मार्बल्स उपलब्ध करून देण्यात येते.

एमपीसी न्यूज – घर सुशोभीकरण करायचे म्हटले की घरातील विविध वस्तूंना विशेष महत्व राहते. त्याचाच एक भाग म्हणजे घरातील टाईल्स, मार्बल, सॅनिटरी वेअर्स या वस्तू देखील घराच्या सौंदर्यात विशेष भर घालतात. चामुंडा मार्बल्स आणि टाईल्स हे हजारो ग्राहकांचा विश्वास संपादन केलेले भोसरीतील अग्रगण्य शोरूम आहे.

14 वर्षांपासून ग्राहकांच्या सेवेत असलेले चामुंडा मार्बल्स आणि टाईल्स हे भोसरीतील सर्वांत भव्य शोरूम आहे. जवळपास 4000 चौरस फूट जागेत हे शोरूम असून तब्बल दीड एकरमध्ये याचे गोदाम आहे. या ठिकाणी सर्व नामांकित कंपनीचे टाईल्स, मार्बल, सॅनिटरी वेअर उपलब्ध आहेत.

विशेष म्हणजे घराच्या इंटिरिअर संबंधित एखादी नवीन वस्तू बाजारात आली तर ती प्रथम चामुंडा मार्बल्स आणि टाईल्सच्या शोरूममध्ये उपलब्ध होते.

ग्राहकांचे घरासंबंधीत वस्तू खरेदीसाठी पहिल्या पसंतीचे हे ठिकाण आहे. या ठिकाणी सर्व प्रकारचे मार्बल्स, ग्रेनाइड टाईल्स, सीपी, सॅनिटरी वेअर्स तसेच मागणीनुसार इटालियन मार्बल्स उपलब्ध करून देण्यात येते.

ग्राहकांनी खरेदी केलेल्या वस्तू घेऊन जाण्यासाठी डिलिव्हरीची उत्तम सोय चामुंडा मार्बल्स मार्फत करण्यात आली आहे. तसेच शोरूममध्ये ग्राहकांसाठी फोन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शोरूममध्ये खास काळजी घेण्यात आली आहे. शोरूममध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन केले जाते. कामगारांना सुरक्षित पोशाख, मास्क तसेच हॅन्ड ग्लोव्ह्ज पुरवण्यात आले आहेत.
येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांना सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले आहे. सरकारी नियमानुसार सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे शोरूम खुले ठेवले जाते.

बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्ट, स्वतंत्र बांधकाम करणारे मार्बल, टाईल्स व सॅनिटरी वेअरच्या खरेदीसाठी चामुंडा शोरूमलाच पसंती देतात. एवढेच नव्हे तर आवश्यकतेनुसार कुशल बांधकाम कारागीर देखील यांच्या मार्फत पुरवले जातात.

आपली वास्तू सुंदर व सुशोभित करण्यासाठी चामुंडा मार्बल्स आणि टाईल्स सदैव तत्पर आहेत. ज्या वस्तूमुळे आपल्या घराची शोभा वाढते. त्या बांधकाम व्यवसायातील उत्तम दर्जाचा व ब्रँडेड माल आमच्याकडे उपलब्ध आहेत.

जर तुम्ही या वस्तूंच्या खरेदीचा विचार करत असाल तर चामुंडा मार्बल आणि टाईल्स शोरूमला एकदा अवश्य भेट द्या, असे आवाहन चामुंडा मार्बल्स आणि टाईल्सचे मालक तुषार जैन यांनी केले आहे.

संपर्कासाठी पत्ता –
श्री चामुंडा मार्बल्स आणि टाईल्स
धावडेवस्ती समोर,
पी.सी.एम.टी डेपो, पुणे- नाशिक रोड
भोसरी – 411049
संपर्क क्र : 9823162636 / 9130806608

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.