Online Fraud : ऑनलाईन फसवणुकीपासून सावध रहा

एमपीसी न्यूज – आपल्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट ऑनलाईन शोधण्याचा प्रयत्न हल्ली सर्वचजण करतात. यात सायबर गुन्हेगारांच्या भूलथापांना बळी पडून फसवणूक, (Online Fraud) चारित्र्यहनन अशा बाबींना अनेकजण बळी पडतात. सायबर गुन्हेगार कोणत्या ना कोणत्या मार्गाने नागरिकांना गंडा घालण्याच्या तयारीत असतात. त्यामुळे प्रत्येकाने सायबर जगात सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. सायबर साक्षर होण्याच्या दृष्टीने नागरिकांसाठी महत्वाच्या बाबी –

# OLX वर वस्तू खरेदी विक्री करू नये

# गुगलवर कस्टमर केअर, हेल्पलाइन नंबर शोधू नये. संबंधित संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावरून मदत क्रमांक घ्यावा.

# ऑनलाइन कर्ज घेऊ नये.

# अनोळखी व्हाट्सअप व्हिडिओ कॉल स्वीकारू नये.

# वीजबिल थकल्याने वीजपुरवठा रात्री कट होणार आहे, असे खोटे मेसेज ब्लॉक करावे.

# फेसबुक प्रोफाईल लॉक करावे. घरातले फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करू नयेत. आपले मित्र आपले फोटो व्हिडिओ बघू शकतील अशी सेटिंग करावी.

# आपले पासवर्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड नंबर सगळे एका रजिस्टर मध्ये घरी लिहून ठेवावे. मोबाईल मध्ये लिहून ठेवणे टाळावे.

# ऑनलाइन माध्यमावर नोकरी सर्च करू नये.

# राजकीय, धार्मिक द्वेष भडकावणारी आणि इतर कोणतीही असंबंधित पोस्ट कोणास ही पाठवू नये.

# क्विक सपोर्ट, टीम विवर, एनी डेस्क मोबाईल ॲप डाऊनलोड करू नये.

# ऑनलाइन फ्रॉड झाल्यास तात्काळ सकाळी दहा ते सहाच्या दरम्यान 1930 वर फोन करून माहिती द्यावी.

www.cybercrime.gov.in यावर ई मेल पाठवावा.

PCMC : उद्यानातील झाडांच्या फांद्या छाटा; नागरिकांची जनसंवाद सभेत मागणी

# कोणीही बँकेतून बोलत असेल तर विश्वास ठेवू नये. आपली डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डची केवायसी माहिती देऊ नये. स्वतः बँकेत जाऊन संपर्क साधावा.

# कोणतेही जिओ, एअरटेल, वोडाफोन यांची केवायसी ऑनलाईन करू नये.

# अश्लील लिंक, अनोळखी लिंक ओपन करू नये.

# कोणत्याही ॲपला allow करू नये, deny करावे.

# ऑनलाइन डिलिव्हरी ॲप बघू नये . तसेच ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर आपली माहिती सेव करून ठेवू नये. ऑर्डर देत असताना कॅश ऑन डिलिव्हरी करावे.

# एकच सारखा पासवर्ड प्रत्येकास देऊ नये ,सोपा पासवर्ड ठेवू नये. घरी पासवर्ड लिहून ठेवावे. दर तीन महिन्यास पासवर्ड बदलावा.

# डेबिट, क्रेडिट कार्डच्या मागे पासवर्ड लिहून ठेवू नये. मागील तीन अंकी cvv नंबर झाकून टाकावा.

# आपल्या क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवू नये. आपल्या एचडीएफसी कार्डच्या डेबिट कार्डला वायफाय असतो.

# कोणतेही मशीनला स्पर्श झाल्यास दोन हजार रुपये वजावट होत असतात.

# एटीएम मशीन मध्ये पैसे काढत असताना स्वॅप मशीन बघावे. पासवर्ड झाकून टाकावा.

# मित्रांचा इंस्टाग्राम हॅक करून आपणास पैसै गुंतवणुकीचा फ्रॉड मॅसेज येणार. मित्रांच्या लिंकला ओपन करून त्यात आपला ईमेल आयडी टाकू नये.

# मोबाईल मधील ॲप जास्त महिने वापरला नसेल डिलीट करावे.

# वर्तमान पेपर मधील घर बसल्या कामाच्या जाहिराती फसवणुकीच्या असतात, काम हवे असल्यास स्वतः त्या ऑफिस मध्ये जावून चौकशी करावी.

# फेसबुक, इंस्टाग्राम, Google, OLX वरील वस्तू बघून विकत घेऊ नये. अनोळखी लोकांना फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारू नये.

# काही व्यक्ती आपणास स्वतः हून आपल्या बँक अकाऊंट मध्ये पैसे पाठवून फसवणूक करतात. त्यांना परत त्यांच्या IFSC code व फक्त बँकेचा अकाऊंट विचारूनच पैसे ट्रान्सफर करावे. एकवेळेस पोलीसांना भेटूनच पुढील कार्यवाही करावी.

# थर्ड पार्टी UPI वापरण्यापेक्षा म्हणजे गूगल पे, फोन पे, पेटीम वापरण्यापेक्षा फक्त बँकेचे QR code वापरून पैशांची देवाण घेवाण करावी.

# मोबाईल मध्ये घरातील फोटो, व्हिडिओ ठेऊ नये, ते सर्व पेन ड्राईव्ह मध्ये ट्रान्स्फर करावे, मोबाईल मध्ये आपले महत्वाचे पासवर्ड, डॉक्युमेंट काहीच ठेऊ नये.

# फेसबुक,इंस्टाग्राम वरील आपले प्रोफाईल एडिट करून only friend करावे, public, friends of friend करू नये

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.