Pune News : पक्षाचा आदेश आलाच तर कसबा पोटनिवडणूक लढवणार – रुपाली ठोंबरे

एमपीसी न्यूज : भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे काही दिवसांपूर्वी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या (Pune News) कसबा विधानसभा मतदार संघातील जागेवर निवडणूक कोण लढवणार याच्यावर आता चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी मात्र पक्षाने आदेश दिला तर आपण ही निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. 

रूपाली ठोंबरे म्हणाल्या, 2019 च्या विधानसभा निवडणुकी वेळी मुक्ता टिळक आजारी होत्या. त्यावेळी माझे तिकीट याच कारणावरून कापण्यात आले होते. आजारी असतानाही मुक्त टिळक यांनी शक्य होईल तेवढं काम केलं आहे. मात्र असं असलं तरीही कसबा विधानसभा मतदारसंघात अनेक विकास कामे झालीच नाहीत. त्यामुळे या ठिकाणी आता निवडणूक लागल्यास काम करणारा माणूस निवडून आला पाहिजे. पक्षाने आदेश दिला तर मी ही निवडणूक नक्की लढवेल असेही ठोंबरे म्हणाले.

Pune News : नव्याने समाविष्ट गावांच्या किमान मुलभूत गरजा पूर्ण करा – रयत स्वाभिमानी संघटना

पुढे ठोंबरे म्हणाल्या, कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करायला पाहिजे असं ज्यांना वाटतं त्यांनी आधीच्या पोट निवडणूका बिनविरोध केल्या आहेत का. (Pune News) ऋतुजा लटके यांना पोट निवडणुकीत कोणी त्रास दिला हे देखील पाहिले पाहिजे. त्यामुळे कसबा मतदारसंघात होणारी पोटनिवडणूक देखील व्हायला हवी असेही त्या म्हणाल्या. दरम्यान मुक्ता टिळक यांचे निधन होऊन अवघे सहा दिवस झाले. आणि असे असतानाच अचानक कसबा पोटनिवडणुकीचा मुद्दा काढणे योग्य आहे का असा देखील प्रश्न आता विचारला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.