Crime News : प्राणघातक हल्ला करून सोनसाखळी चोरणारा अटकेत

एमपीसी न्यूज – प्राणघातक हल्ला करून सोनसाखळी चोरणाऱ्याला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांनी शुक्रवारी (दि.26) सिंहगड रोड येथे केली.

आशिष जितेंद्र दुबे (वय 21 रा. दत्तवाडी) असे अटक आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मंदिरात पुजेसाठी जाणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करत त्यांच्यागळ्यातील पाच तोळ्याची चैन हिसकावली होती.

याचा तपास करत असताना दत्तवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, अमित सुर्वे व प्रशांत शिंदे यांना बातमी मिळाली की, या गुन्ह्यातील आरोपी हा निलायम ब्रिजखाली एकाला भेटण्यासाठी येणार आहे. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून पोलिसांनी दुबे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता, आरोपी व त्याचा मित्र दयानंद ऊर्फ गौतम देवेंद्र साळुंखे (रा.दत्तवाडी) यांनी मिळून हा गुन्हा केल्याचे कबुल केले.दुबे याच्यावर दरोडा व खूनाच प्रयत्न हा गुन्हा दाखल केला असून त्याचा साथीदार साळुंखे हा देखील पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. दत्तवाडी पोलीस त्याचा शोध घेत असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.