Mahesh Landge: अटल बिहारी वाजपेयी यांचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी – महेश लांडगे

एमपीसी न्यूज : देशाला विकास आणि सुशासनाचा मंत्र देणाऱ्या स्वर्गीय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे संपूर्ण जीवन हे येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी आदर्शवत विचार आहे.(Mahesh Landge) आपल्या विचारातून लाखो नागरिकांना प्रभावित करणारे त्यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते, असे मत भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.

स्वर्गीय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी निमित्त मंगळवारी मोरवाडी येथील भाजप कार्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.(Mahesh Landge) यावेळी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, जिल्हा सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, विजय फुगे, माजी नगरसेविका सुजाता  पालांडे, उपाध्यक्ष नंदू दाभाडे, समीर जावळकर, गणेश ढाकणे, कैलास सानप, दिनेश यादव, योगेश सोनवणे, सचिन बंदी, मुकेश चुडासमा, कमलेश भरवाल, सतीश नागरगोजे, मंगेश धाडगे आदी सर्वजण उपस्थित होते.

Sahara old age home: सहारा वृध्दाश्रमात विधू विनोद चोप्रा यांच्या हस्ते ध्वजारोहण 

यावेळी आमदार महेश लांडगे म्हणाले, माजी पंतप्रधान आदरणीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी त्यांना स्मरण करून नमन करतो. देशाला विकास आणि सुशासनाचा मंत्र देणाऱ्या अटलजींचे संपूर्ण जीवनच आदर्शवत आहे. भारताच्या विकासाच्या वाटचालीत त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे.(Mahesh Landge) अटलबिहारी वाजपेयी हे उत्तम वक्ते, विचारवंत आणि आपल्या भाषणांद्वारे लाखो नागरिकांना प्रभावित करणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. भारताची आर्थिक प्रगती आणि जागतिक स्तरावर भारताचे महत्व वाढण्याचे महत्वपूर्ण कार्य वाजपेयी यांच्या दूरदर्शी नेत्तृत्वात झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.