Sandeep Deshpande Attack : आदित्य ठाकरे, संजय राऊत यांचा हल्ल्यामागे हात, मनसेचा गंभीर आरोप

एमपीसी न्यूज : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेला हल्ला हा नियोजित होता. तसेच राजकीय हल्ला असण्याची शक्यता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी (Sandeep Deshpande Attack) व्यक्त केली आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी. लगेच आरोपी सापडतील, असा दावा आरोप करताना मनसे नेते अमेय खोपकर यांनी केला आहे.

दरम्यान, या हल्ल्याचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निषेध केला आहे. असा हल्ला कोणावरही होणे चुकीचे आहे. पोलिसांनी हल्लेखोरांना तात्काळ अटक केली पाहिजे, असे ते म्हणाले. भाजपकडूनही यावर प्रतिक्रीया आली आहे. संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा भाजपने निषेध केला आहे. अत्यंत चुकीच्या पद्धतीने नेत्यांवर हल्ला होत असून, मलाही धमक्या आल्या आहेत अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे.

Maharashtra : शिवसेनेची ‘शिवधनुष्य’ यात्रा महाराष्ट्रात लवकरच

संदीप देशपांडे आज सकाळी दादर शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी अज्ञातांकडून हल्ला झाला. देशपांडे यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत. राजकीय वैमन्यस्यातून अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. देशपांडे हे समाजमाध्यमांवर नेहमीच टीका करीत असतात, त्याचा राग मनात ठेवून हा हल्ला झाला असल्याची चर्चा आहे. मुंबई पोलिसांनी देशपांडे यांचा जबाब नोंदविल्याची माहिती आहे. हल्ल्यानंतर पोलीस थेट रुग्णालयात पोहोचले होते.

देशपांडे यांच्यावर केलेला हा भ्याड हल्ला आहे. या हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. संदीप देशपांडे हे एक कट्टर मनसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेची विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेतून झाली. (Sandeep Deshpande Attack) त्यावेळी विद्यार्थी सेनेचे काम राज ठाकरे पाहायचे. त्यांनीच संदीप देशपांडे यांना महाविद्यालयीन निवडणुकीत संधी दिली आणि ते विजयी देखील झाले. 1995 मध्ये संदीप देशपांडे भारतीय विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस झाले. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडत मनसेची स्थापना केली. तेव्हापासून ते आजपर्यंत संदीप देशपांडे मनसेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.