PCMC : ‘मॅट’च्या आदेशाला उच्च न्यायालयाची स्थगिती, अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे यांना दिलासा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे यांची नियुक्ती रद्द करण्याच्या महाराष्ट्र प्रशासकीय लवाद (मॅट)च्या आदेशाला (PCMC) मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. 17 मार्च पर्यंत ही स्थगिती असून जांभळे यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

पिंपरी महापालिकेतच उपायुक्त असलेल्या स्मिता झगडे यांची 13 सप्टेंबर 2022 रोजी राज्य सरकारने अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली होती. पण, आयुक्त शेखर सिंह यांनी नऊ दिवस झगडे यांना रुजू करुन घेतले नव्हते. त्यानंतर राज्य सरकारने 22 सप्टेंबर 2022 रोजी झगडे यांची नियुक्ती रद्द करुन प्रदिप जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली.  झगडे यांनी जांभळे यांच्या नियुक्तीला ‘मॅट’मध्ये आव्हान दिले. झगडे यांनी राज्य सरकार, प्रदीप जांभळे आणि महापालिका आयुक्त यांना प्रतिवादी केले होते.

Sandeep Deshpande Attack : आदित्य ठाकरे, संजय राऊत यांचा हल्ल्यामागे हात, मनसेचा गंभीर आरोप

त्यावर महाराष्ट्र प्रशासकीय लवाद (मॅट)चे सदस्य ए.पी. कु-हेकर यांच्या खंडपीठापुढे सुनावण्या झाल्या. सुनावणीअंती मॅटने 17 फेब्रुवारी रोजी राज्य शासनावर ताशेरे ओढत जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदावरील नियुक्ती रद्द करण्याचा आदेश दिला होता.(PCMC) दोन आठवड्यात झगडे यांना महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती देण्याचेही आदेशात म्हटले होते. पण, ‘मॅट’च्या या निर्णयाला जांभळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. जांभळे यांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. त्यावर न्यायालयाने ‘मॅट’च्या आदेशाला 17 मार्चपर्यंत स्थगिती दिली. त्यामुळे जांभळे यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.