Ayodhya trip cancelled : राज ठाकरे यांचा आयोध्या दौरा रद्द

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला पाच जूनचा आयोध्या दौरा रद्द केला आहे.याबाबत त्यांनी व्टिटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

 

आपण आयोध्येचा दौरा का रद्द केला त्याचे कारण येत्या रविवारी पुण्यात होणार्या सभेत स्पष्ट करणार असल्याचे राज ठाकरे यांनी आपल्या व्टिटमध्ये म्हंटले आहे.राज ठाकरे यांची तब्येत ठिक नसल्याचे वृत्त असतानाच त्यांनी आता हे व्टिट केले आहे.

 

मशिदिंवरील भोंगे काढून टाकावेत अन्यथा मनसेचे कार्यकर्ते त्यांच्या आवाजाच्या दुप्पट जोरात हनुमान चालिसा म्हणतील असे फर्मान त्यांनी काढून वाद निर्माण केला होता.यापूर्वी त्यांनी बिहार,उत्तर प्रदेशमधून आलेल्या नागरीकांनी महाराष्ट्रा राहू नये यापध्दतीचे आंदोलन केले होते आणि त्यातून आंदोलन केले होते.

 

भारतीय जनता पक्षाचे उत्तर प्रदेशातील आमदार ब्रिजभूषण शर्मा सिंह यांनी राज ठाकरे यांच्या आयोध्या दौर्याला विरोध केला होता. त्यांनी प्रथम उत्तर भारतीयांची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतरच राज यांनी आयोध्येत यावे असे आवाहन त्यांनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.