Shashikant Limaye : पुण्याचे ‘मेट्रोमॅन’ शशिकांत लिमये यांचे निधन

एमपीसी न्यूज – पुण्याचे मेट्रोमॅन म्हणून ओळख असलेले शशिकांत लिमये (Shashikant Limaye) यांचे निधन झाले. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी पुणे आणि पिंपरी – चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार म्हणून काम पाहिलंय. काल त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने राहत्याच घरी निधन झाले.   

Ayodhya trip cancelled : राज ठाकरे यांचा आयोध्या दौरा रद्द

हृदयविकाराचा झटका येताच त्यांना तातडीने रुग्णालयात (Shashikant Limaye) दाखल करण्यात आले. मात्र, त्यापुर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि भाऊ असा परिवार आहे. भारतीय रेल्वेतील तज्ञ अधिकारी म्हणून सुद्धा त्यांची ओळख होती. महामेट्रोमध्ये त्यांची 2014 मध्ये पुणे मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. पुणे आणि पिंपरीतील मेट्रोचा आराखडा तयार करण्यातही लिमये यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.