Baramati Crime News : अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर बलात्काराचा प्रकार उघड, एकावर गुन्हा दाखल

एमपीसीन्यूज : अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली. एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला आहे.

प्रतीक रासकर, असे या आरोपीचे नाव आहे. बारामती पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपहरण बलात्कार आणि बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या या माहितीनुसार, पीडित मुलगी पुण्यातील येरवडा परिसरातील रहिवाशी आहे. आरोपीने मे ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत लग्नाचे अमिष दाखवून बारामतीतील वेगवेगळ्या लॉजमध्ये तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून ही मुलगी गरोदर राहिली.

हा सर्व प्रकार पीडित मुलीच्या कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सुरुवातीला येरवडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. तिथून अधिक तपासासाठी ही फिर्याद बारामती पोलिसांकडे देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.