Bavdhan Theft: बावधन येथील घड्याळ्याच्या दुकानातून सव्वा पाच लाखांची घड्याळ चोरीला

 एमपीसी न्यूज : बावधन येथील इन्फिनिटी एंटरप्रायजेस या घड्याळ्याच्या दुकानातून सव्वा पाच लाखांची ब्रॅण्डेड घड्याळे चोरीला गेली आहेत.(Bavdhan Theft) ही घरफोडी मंगळवारी (दि.2) मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दिलीप बबन धावडे (वय58 रा.म्हातोबानगर, कोथरूड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे बावधन येथील ओंकार गार्डन जवळ इन्फिनीटी एन्टरप्रायजेस नावाचे दुकान आहे. मंगळवारी दुकानबंद करून ते घरी गेले होते.

Chikhali News : संतपीठासाठी फर्निचर, बाकडे खरेदी करणार

 

यावेळी अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलुप तोडून दुकानातील फास्टट्रॅक कंपनीची 32 हजार 370 रुपयांची 11 मनगटी घड्याळे, सोनटा कंपनीची 39 हजार 909 रुपयांची 28 मनगटी घड्याळे, फास्टट्रॅक कंपनीची 1 लाख 45 हजार 155 रुपयांची 52 स्मार्ट घड्याळे, 9 हाजर रुपयांचे गॉगल, (Bavdhan Theft) 4 हजार रुपयांचे सिग्नेचर गॉगल, अडीच हजार रुपयांची बॅग, व 700 रुपये रोख व 25 बँक चेक असा एकूण 5 लाख 35 हजार 506 रुपयांचा ऐवज चोरला आहे. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.