Pimpri : मुलाला मारल्याचा जाब विचारल्याने मारहाण; एकाला अटक

Beaten for asking the reason for beating son; one arrested.

एमपीसी न्यूज – मुलाला मारल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या वडिलांना दोघांनी बेदम मारहाण केली. धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. तसेच दोन वाहनांची तोडफोड केली. ही घटना 13 जुलै रोजी रात्री पावणे आठ वाजता विद्यानगर, चिंचवड येथे घडली. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे.

बंटी भवरसिंग राजपूत (वय 24, रा. विद्यानगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह विक्की भवरसिंग राजपूत (वय 27, रा. विद्यानगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तोहफा गब्बर पवार (वय 40, रा. विद्यानगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांचा मुलगा तुषार याला दमदाटी केली. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी पवार आरोपींकडे गेले.

त्यावेळी आरोपी विक्की याने पवार यांना धारदार शस्त्राने मारून जखमी केले. तसेच बंटी याने हाताने मारहाण केली. पवार यांना दमदाटी करत शिवीगाळ केली.

त्यानंतर आरोपींनी दोन दुचाकींची तोडफोड करून त्यांचे नुकसान केले. पोलिसांनी बंटीला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.