Chakan News : पिकाची नासधुस करत आई व मुलाला मारहाण; दहा जणांवर गुन्हा

 एमपीसी न्यूज – शेतात मका आणि हत्ती गवत ट्रॅक्टरने (Chakan News) रोटर टाकत असताना अडविल्याने दहा जणांनी मिळून महिला आणि तिच्या मुलाला मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 27) सकाळी राक्षेवाडी, चाकण येथे घडली.

सत्यवान ज्ञानोबा राक्षे, संतोष बाळू राक्षे, बाळू नामदेव राक्षे, सुभाष ज्ञानोबा राक्षे, किरण दिलीप कौटकर, पाच महिला (सर्व रा. राक्षेवाडी, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri News : सतराव्या कामगार साहित्य संमेलनात रंगले अभिरूप न्यायालय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्यवान आणि संतोष हे शेतात मका आणि हत्ती गवत ट्रॅक्टरने रोटारुन टाकत होते. त्यावेळी फिर्यादी महिला, त्यांचे पती, मुलगा आणि मुलगी हे मका पिकाचे नुकसान करण्यापासून दोघांना अडवत होते. तिथे आलेल्या अन्य सात जणांनी फिर्यादी महिला आणि (Chakan News) त्यांच्या मुलाला शिवीगाळ करत हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात फिर्यादी आणि त्यांचा मुलगा जखमी झाला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.