Pune News : महाराष्ट्रातील 43 पोलीस अधिकाऱ्यांना सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदक

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्यातील सन 2018 ते 2021 या कालावधीत गुन्हे तपासामध्ये उत्कृष्ट प्राविण्य दाखविणाऱ्या 43 पोलीस अधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री,(Pune News) भारत सरकार यांच्याकडून सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदक देण्यात आले. हा सन्मान महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक रजनिश सेठ यांच्या हस्ते झाला.

सन 2018 ते 2021 पर्यंत महाराष्ट्र राज्यातील पुरस्कारपात्र पोलीस अधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री यांचे सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदक प्रदान समारंभ आज दि.15 रोजी पुण्यातील पोलीस संशोधन केंद्र, येथे पोलीस महासंचालक रजनिश सेठ यांचे हस्ते पार पडला.  या कार्यक्रमामध्ये एकुण 43 पुरस्कारपात्र पोलीस अधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार यांचे पदक व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

पुरस्कारपात्र पोलीस अधिकारी यांनी खून, दरोडा, जबरी चोरी, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गुन्हे, पोक्सो अंतर्गत गुन्हे, मतिमंद व मुकबधिर मुलींचे लैंगिक शोषण यासारखे गंभीर गुन्हे अत्यंत कौशल्याने आधुनिक तपास पध्दतीचा अवलंब करुन उघडकीस आणले आहेत.

Pune News : पुण्यात भरणार दोन दिवसीय ‘तुलिका’हे आगळे-वेगळे कला प्रदर्शन

पोलीस महासंचालक यांनी पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकारी यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.समारंभास प्रशांत बुरडे, अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे, रितेशकुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड, सुरेश कुमार मेकला, विशेष पोलीस महानिरीक्षक (गुन्हे पश्चिम), सुधीर हिरेमठ, विशेष पोलीस महानिरीक्षक (रा.गु.अ.कें.) दिनेश बारी, पोलीस अधीक्षक (कायदा व संशोधन) गुन्हे अन्वेशण. विभाग पुणे याशिवाय इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते.

राज्य स्तरावरील केंद्र शासनास पात्र पोलीस अधिकारी यांच्या शिफारसी पाठविताना पोलीस महासंचालक यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य, पुणे, विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) महाराष्ट्र राज्य, विशेष पोलीस महानिरीक्षक (गुन्हे पश्चिम) गुन्हे अन्वेशन.विभाग विशेष पोलीस महानिरीक्षक  यांची समिती गठित करण्यात आली होती.

निवड समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यामधून प्राप्त झालेल्या शिफारसी अहवालांची निकषांनुसार पडताळणी होवुन एकुण 22 पोलीस अधिकारी यांचे शिफारसी अहवाल (Pune News) केंद्रीय गृहमंत्रालय येथे पाठविण्यात येतात. त्यापैकी राज्यातून दरवर्षी 11 पोलीस अधिकारी यांची निवड केंद्रीय गृहमंत्री यांचे सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदकासाठी करण्यात येते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.