Talegaon : भिकाबाई बाळसारफ यांचे निधन

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या भिकाबाई दगडू बाळसारफ (वय८५) यांचे गुरुवारी सकाळी (दि.२७) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले,तीन मुली,सुना,नातवंडे,पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. पायी पंढरपूर वारीमध्ये त्यांचा नेहमी सहभाग असायचा.

तळेगाव दाभाडे रोटरी क्लबच्या वतीने त्यांना २०१३ मध्ये ‘आदर्शमाता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य डॉ.दत्तात्रय बाळसारफ, सामाजिक कार्यकर्ते किसन बाळसारफ, तळेगाव लायन्स क्लबचे माजी सेक्रेटरी दीपक बाळसाराफ यांच्या त्या मातोश्री, तर डॉ.ओंकार बाळसराफ, प्रशांत बाळसराफ, ऋतुराज बाळसराफ यांच्या त्या आजी होत. पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा स्नेहल बाळसराफ यांच्या त्या सासूबाई होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.