Pimpri : छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीला शासकीय सुटी जाहीर करण्याची पिंपरी युवासेनेची मागणी

एमपीसी न्यूज – छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन हे भारतीय युवकांसाठी प्रेरणा दायक असून संभाजीराजे यांचे बलिदान येणाऱ्या पुढील पिढ्यांना देखील स्फूर्ती देत रहावे यासाठी धर्मवीर संभाजी राजे यांचा जन्मदिवस हा शासकीय सुट्टी म्हणून जाहीर करुन त्या दिवशी विविध ऐतिहासिक कार्यक्रमाची आयोजन केले जावे या मागणीचे निवेदन पिंपरी विधानसभा युवासेनेतर्फे तहसील कार्यालय आकुर्डी येथे नायब तहसीलदार  विकी परदेशी यांना देण्यात आले.

यावेळी शिवभक्त मावळ तालुक्याचे युवासेना प्रमुख अनिकेत घुले, जिल्हा समन्वयक रुपेश कदम , युवती सेना अधिकारी प्रतिक्षा घुले,  अभिजीत गोफण , विभाग संघटक निलेश हाके,  विभागप्रमुख राजेश वाबळे, कामिनी शर्मा,  कल्पना जाधव, राहुल पलांडे, अक्षय येळवंडे,  ओंकार जगदाळे, ऍड.अजित बोराडे, सनी कड, राहुल राठोड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाकडे या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी लवकरच आमदार गौतम चाबुकस्वार यांचे नेतृत्वाखाली मुख्यमंत्री यांची भेट घेऊन याविषयी निवेदन देण्यात येणार असल्याचे प्रतीक्षा घुले व निलेश हाके यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.