Bhosari : मंदिराची दानपेटी फोडून 17 हजारांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज – भोसरी येथील संत शिरोमणी मंदिरातील दानपेटी फोडून 17 हजारांची रोकड चोरीला गेली आहे. ही घटना शुक्रवार (दि. 7) ते शनिवार (दि. 8) सकाळी सहाच्या दरम्यान घडली आहे.

शंकर चंद्रकांत लोंढे (वय 30, रा. लोंढे आळी, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मंदिर बंद केल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडून त्यातील चिल्लर व नोटा अशी सुमारे 17 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. शनिवारी सकाळी सहा वाजता मंदिर उघडले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.