Bhosari Crime News : मोबाईल चोरीचा आरोप करत एकास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – मोबाईल चोरी केल्याचा आरोप करत एका बेदम मारहाण करून जिन्यावरून ढकलून दिले. यामध्ये मारहाण झालेल्या व्यक्तीचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. ही घटना 27 मे रोजी शांतीनगर झोपडपट्टी भोसरी येथे घडली.

गणेश संजय काळे (वय 30, रा. शांतीनगर झोपडपट्टी, भोसरी) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याबाबत गुरुवारी (दि. 3) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर बाळकृष्ण गायकवाड (वय 24, रा. शांतीनगर झोपडपट्टी, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर याने फिर्यादी गणेश यांच्यावर मोबाईल चोरी केल्याचा आरोप केला. तसेच त्यावरून गणेश यांना शिवीगाळ दमदाटी करून हाताने व लाथाबुक्क्यांनी तोंडावर, पोटात, पाठीत  मारले. गणेश यांना जिन्यावरून ढकलून दिले. त्यात त्यांच्या दोन्ही पायाला फ्रॅक्चर झाले.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.