Bhosari : आरोग्य संपन्न नागरिक हिच देशाची खरी संपत्ती -डॉ पगारिया

एमपीसी न्यूज – सुदृढ व निरोगी बलशाली भारताच्या प्रगतीसाठी (Bhosari)आरोग्य- संपन्न नागरिक हीच खरी संपत्ती आहे .छोट्या मोठ्या आजारां चे निदान त्वरित करून त्यावर आवश्यक आधुनिक उपचार मिळाले पाहिजेत, यासाठी आशा आरोग्य शिबिरांचे आयोजन सामाजिक जबाबदारी समजून केले पाहिजे असे मत ज्येष्ठ शिक्षण तज्ञ व समाजसेवी डॉ अशोक कुमार पगारिया यांनी व्यक्त केले.

ते आनंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रोटरी क्लब ऑफ डायनामिक भोसरी (Bhosari)यांच्या संयुक्त विद्यमाने आनंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल भोसरी येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित मोफत रोग निदान व उपचार शिबिरात बोलत होते.

Pune : उत्तम गायनासाठी ‘भाव‌’ महत्त्वाचा – पद्मजा फेणाणी-जोगळेकर

यावेळी जेष्ठ फिजिशियन डॉ अनिल खाडे आणि रोटरी क्लब ऑफ अध्यक्ष उद्योजक ज्ञानेश्वर विधाते मधुमेह तज्ञ डॉ कृष्णा दळवी, अस्थिरोग तज्ञ डॉ प्रशांत पवार, स्त्रीरोग तज्ञ डॉ योगेश गाडेकर ,सामाजिक कार्यकर्ते कुंडलिक लांडगे , राहुल लांडगे ,उद्योजक संजय उदावंत, उत्सव होम असोसिएशनचे अध्यक्ष अप्पासाहेब काळजे, आनंद हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ संतोष मोरे ,डॉ पांडुरंग लांडगे, सचिव दीपक सोनवणे ,अण्णासाहेब मटाले, दत्ता कोल्हे निवृत्ती लांडगे विनायक बागडे आदी उपस्थित होते.

आनंद हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संतोष मोरे यांचा वैद्यकीय सेवेतील विशेष योगदानाबद्दल हेल्थ आयकॉन पुरस्काराने महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला संस्थेच्या वैद्यकीय सेवेला मिळालेली कौतुकाची थाप परिवाराचा सन्मान आहे त्यामुळे आनंद हॉस्पिटल परिवाराच्या वतीने डॉ मोरे यांचा डॉ पगारिया यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.

शिबिरामध्ये मधुमेह , हृदयरोग ,रक्तदाब आणि इतर फुफुसांच्या आजारावर , हाडांचे सर्व विकार आणि मणक्याचे सर्व विकार अशा आजारांवर तपासणी व उपचार करण्यात आले, या शिबिरामध्ये हाडांची ठिसूळता म्हणजेच बीएमडी तपासणी, शुगर तपासणी मोफत करून देण्यात आली, या शिबिराचा लाभ 375 नागरिकांनी घेतला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक सोनवणे , आभार प्रदर्शन डॉ संतोष मोरे यांनी केले,कार्यक्रम यशस्वी, करण्यासाठी डॉ विद्या फल्ले , डॉ ऋतुजा उचाळे यांनी परिश्रम घेतले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.