Pune: श्रीरंग कलानिकेतनच्या संगीत महोत्सवात पंडित अजय पोहनकरांची उपस्थिती;सुरमणी धनंजय जोशी यांची सुरेल मैफिल… 

एमपीसी न्यूज –करोना च्या संकटामुळे खंडित झालेला श्रीरंग कलानिकेतन (Pune)चा संगीत महोत्सव या वर्षीच्या २६ जानेवारी पासून पुन्हा सुरु झाला. कांतीलाल शहा विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या सुरेल मैफिलीत या वर्षी गंधर्व संगीत सभा गाजविलेले सूरमणी धनंजय जोशी यांनी रंग भरला.

आणि या मैफिलीला धनंजय जोशी यांचे गुरु प्रख्यात गायक पंडित (Pune)अजय पोहनकर उपस्थित राहिल्यामुळे मैफिलीची रंगत वाढली.

सुरवातीला धनंजय जोशी यांनी ‘गुंज रही किरत तुम्हारी’ ही नट भैरव रागातील बंदिश बडा ख्यालात , विलंबित एकतालात सदर केली. त्यानंतर पंडित सी. आर. व्यास रचित रचना’सुरज चंदा’ तिंतालातसादर केली आणि मैफिली रंग भरायला सुरुवात केली.

Pimpri : एक किलो गांजासह 19 वर्षीय तरुणाला पिंपरीतून अटक

‘तुझीया गे चरणीचा दास’ हे सं. महानंदा नाटकातील पद….., या नवल नयनोत्सवा…,(संगीत मानापमान)

रतिहुनी सुंदर मदन मंजिरी ( सं. सुवर्णतुला ), ‘नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी’ हे कविवर्य बा. भ. बोरकरांचे गीत सादर करून रसिकांची दाद मिळवली.

आणि शेवटी ‘राम नाम ज्याचे मुखी’ हा संत एकनाथांचा अभंग गाऊन कार्यक्रमाची सांगता केली.या सुरेल मैफिलीला तितकीच सुंदर संवादिनी साथ उमेश पुरोहित यांची तर तबला साथ संतोष साळवे यांची होती.

या कार्यक्रमात श्रीरंग कलानिकेतन चा2022 चा सेवाव्रती पुरस्कार श्रीरंग कलानिकेतन च्या माजी अध्यक्षा श्रीमती वर्षाताई किबे यांना तर २०२३ चा सेवाव्रती पुरस्कार श्रीरंग कलानिकेतन चे माजी कोषाध्यक्ष तसेच गुरु व ज्येष्ठ कलाकार, प्रसिद्ध व्हायोलीन वादक डॉ.अरविंद लांडगे यांना पं. अजय पोहनकर यांचे हस्ते देण्यात आला.

प्रवेश द्वारासामोरील सुरेख रांगोळी रूपाली झवेरी यांची होती, ध्वनी व्यवस्थापन केदार अभ्यंकर यांचे तर कार्यक्रमाचे चित्रण फोटो श्रीकांत चेपे यांचे होते.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉक्टर नेहा कुलकर्णी, डॉक्टर राजेंद्र कुलकर्णी, सीमा आवटे, बागेश्री लोणकर, दिपक आपटे, राजीव कुमठेकर, किरण पळसुले देसाई, प्रदीप जोशी, विनय कशेळकर, सुनील सोनार आणि विश्वास देशपांडे यांनी योगदान दिले .

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.