Bhosari : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

ही घटना सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2019 या कालावधीत बोपखेल येथे घडली. : Rape of a minor girl on the pretext of marriage

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. ही घटना सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2019 या कालावधीत बोपखेल येथे घडली.

या प्रकरणी मंगळवारी (दि. 4 ऑगस्ट 2020) भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी कार्तिक विजेंद्र जिनवाल (वय 19) याला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पीडीत मुलीच्या वडिलांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सप्टेंबर – ऑक्टोबर 2019 या कालावधीत आरोपीच्या घरी घडली. फिर्यादी यांच्या पीडित मुलीसोबत  आरोपी याने जवळीक साधून तिला लग्नाचे अमिष दाखवले.

ती अल्पवयीन आहे हे त्यास माहिती असून देखील त्याने तिच्याशी शाररीक संबंध प्रस्थापित केले. तिला गरोदर ठेवले. बदनामी होईल याच्या भीतीने फिर्यादी यांनी सुरुवातीला तक्रार देण्यास नकार दिला. नंतर त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.