Bhosari : टेम्पो चालकाकडे पैशांची मागणी करत मारहाण

एमपीसी न्यूज – टेम्पो चालकाकडे पैशांची मागणी करून त्याला मारहाण करण्यात आली. तसेच टेम्पोची तोडफोड करून चालकाच्या खिशातून जबरदस्तीने चार हजार रुपये काढून घेतले. ही घटना पवारवस्ती दापोडी येथे बुधवारी (दि. 23) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

गोविंद सखाराम भोसले (वय 22, रा. सिद्धिविनायक कॉलनी, टॉवर लाईन, निगडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सोमेश्वर माने (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोविंद टेम्पो चालक आहे. तो कामानिमित्त दापोडी मधील पवारवस्ती येथे गेला होता. दुपारी साडेतीनच्या सुमारास आरोपींनी त्याला अडवले. त्याच्याकडे पैशांची मागणी केली. त्याच्या टेम्पोच्या काचा फोडून टेम्पोचे नुकसान केले. गोविंद याच्या डोक्यात दगड आणि काठीने मारले. यामध्ये गोविंद जखमी झाला. आरोपींनी त्याच्या खिशातून जबरदस्तीने चार हजार रुपये काढून घेतले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.