Bhosari Crime News : बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक; पिस्टलसह चार काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 34 हजार रुपये किमतीचे एक पिस्टल, चार काडतुसे तसेच एक मॅक्झिन जप्त करण्यात आले. ही कारवाई रविवारी (दि. 20) दुपारी साडेतीनच्या सुमारास भोसरी येथील गाव जत्रा मैदान येथे करण्यात आली.

योगेश शिवाजी दाभाडे (वय 22), निलेश पुंडलिक चव्हाण (वय 21), जगदीश बाळू शेळके (वय 21, तिघेही रा. भोसरी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी सागर भोसले यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे विक्रीसाठी बेकायदेशीर शस्त्र बाळगत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार भोसरी पोलिसांनी कारवाई करून आरोपींना पकडले. त्यांच्याकडून एक पिस्टल, चार काडतुसे तसेच एक मॅक्झिन असा 34 हजार रुपये किमतीचा माल जप्त केला.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात घातक शस्त्र बाळगण्यास मनाई आहे. पोलीस आयुक्तांनी याबाबतचा आदेश दिला आहे. आरोपींनी या आदेशाचा भंग केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.