Bhosari Crime News : भेसळयुक्त डिझेलची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – भेसळयुक्त डिझेलची विक्री करणा-या दोघांना भोसरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पावणे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.02) भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृहाजवळील मोकळ्या मैदानात हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी ऋषिकेश सतिश कदम (वय 24, रा. भोसरी, मुळगाव – सोलापूर) तसेच, रोहन शशिकांत हडपे (वय 28, रा. मालवण, सिंधुदुर्ग) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

भोसरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पद्मभूषण गायकवाड यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी हे एमएच/12 /एसएफ 7958 या पिकअपमधून भेसळयुक्त डिझेलची विक्री करताना आढळून आले. त्यांच्याजवळून पावणे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम पुढील तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.