Bhosari Crime News : गुटखा विक्री प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – विक्रीसाठी गुटखा जवळ बाळगल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 28) रात्री लांडगेनगर, भोसरी येथे करण्यात आली.

गजानन ज्ञानबा शिंदे (वय 42, रा. लांडगेनगर, भोसरी), महेश दत्तात्रय काळकुटे (वय 39, रा. तळेगाव रोड, शिक्रापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई विनोद वीर यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांडगेनगर, भोसरी येथील इंडियन ऑइल पंपाच्या मागे दोघेजण बेकायदेशीरपणे गुटखा विकत असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 15 हजार 840 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मोहारे तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.