Bhosari: डी. आर. गव्हाणे पेट्रोल पंपावरील सुरक्षा आणि सेवा वाखाणण्याजोगी

पंपावरील कर्मचाऱ्यांची खास काळजी घेण्यात आली असून कामावर रुजू होण्यापूर्वी त्यांची वैदयकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यांना दररोज नवीन मास्क दिले जातात तसेच त्यांना पोशाख देण्यात आला आहे

एमपीसी न्यूज – भोसरी मधील अगदी सुरवातीचा पेट्रोल पंप असलेल्या डी. आर गव्हाणे पेट्रोल पंपावर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर घेतलेली सुरक्षेची काळजी आणि पुरवण्यात येणारी सेवा याचे ग्राहक कौतुक करत आहेत.

देशात लॉकडाऊन लागू करण्यात आल्यापासून सर्व सरकारी नियमांचे पालन करत डी. आर. गव्हाणे पेट्रोल पंपावर ठरलेल्या वेळेत निरंतर सेवा पुरवली जात आहे.

पंपावर फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन केले जाते. पेट्रोल, डिझेल अथवा सीएनजी भरण्यासाठी येणाऱ्या वाहनांसाठी सुरक्षित अंतरावर रकाने आखून वाहने उभी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

पंपावरील कर्मचाऱ्यांची खास काळजी घेण्यात आली असून कामावर रुजू होण्यापूर्वी त्यांची वैदयकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यांना दररोज नवीन मास्क दिले जातात तसेच त्यांना पोशाख देण्यात आला आहे. सर्व कर्मचाऱ्यांना वारंवार हात सॅनिटाइज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भोसरी परिसरात सीएनजी इंधन पुरवणारा हा प्रथम पंप आहे. दिवंगत दामोदर रामभाऊ गव्हाणे यांनी स्थापन केलेल्या या पंपाचा कार्यभार सध्या आनंद फुगे सांभाळतात.

कोरोना विषाणू आणि वाढत्या संसर्गाच्या पार्श्ववभूमीवर डी. आर. गव्हाणे पेट्रोल पंपावर केलेल्या सुरक्षा व्यवस्थेचे लोक कौतुक करत आहेत.

सीएनजी, पेट्रोल आणि डिझेल यांची विश्वासहार्य सेवा देणारा पंप म्हणून पेट्रोल पंपाची ओळख आहे. आम्ही शुद्धता आणि सर्वांची सुरक्षा याबाबत अजिबात तडजोड करत नाही.

कोरोनाची भयावह परिस्थिती पाहता आम्ही सर्व काळजी घेत आहोत तसेच ग्राहकांना सेवा पुरवत आहोत. लोकांनी सुद्धा या परिस्थितीत काळजी घायला हवी अशी भावना अनंद फुगे यांनी व्यक्त केली.

पत्ता –
डी. आर गव्हाणे पेट्रोल पंप
सर्वे नंबर 207/1, भोसरी आळंदी रोड,
रामनगरी जवळ, भोसरी 411039

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.