Chikhali: सोसायटीच्या पार्किंगमधून कार चोरीला

Chikhali: Car stolen from society's parking lot कारमध्ये लायसन्स, बँकेचे डेबिट कार्ड, चेकबुक, कंपनीचे आय कार्ड, ड्रील मशीन, व्हॅक्युम क्लिनर, मिनी कॉम्प्रेसर मशीन असे दोन हजारांचे सामान देखील चोरट्यांनी चोरून नेले आहेत.

एमपीसी न्यूज – सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली कार अज्ञातांनी चोरून नेली. कारमध्ये महत्वाची कागदपत्रेही होती. ही घटना शुक्रवारी (दि.24) दुपारी बारा ते शनिवारी (दि. 25) सकाळी सहा वाजताच्या कालावधीत बीआय साई आंगण सोसायटी, पूर्णानगर, चिंचवड येथे घडली.

विशाल पंढरीनाथ दळवी (वय 38, रा. बीआय साई आंगण सोसायटी, पूर्णानगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पत्नीच्या नावावर असलेली स्विफ्ट डिझायर कार (एमएच 12 एनपी 2698) फिर्यादी यांनी शुक्रवारी दुपारी बारा वाजता त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली.

अज्ञात चोरट्यांनी त्यांची 3 लाख 72 हजार 950 रुपये किमतीची कार चोरून नेली. कारमधील लायसन्स, बँकेचे डेबिट कार्ड, चेकबुक, कंपनीचे आय कार्ड, ड्रील मशीन, व्हॅक्युम क्लिनर, मिनी कॉम्प्रेसर मशीन असे दोन हजारांचे सामान देखील चोरट्यांनी चोरून नेले आहेत. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.