Bhosari : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – माहेरहून वारंवार पैशांची मागणी करत सासरची मंडळी विवाहितेचा शारीरिक व मानसिक त्रास करत. या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.

संदीप विष्णू हसनाळे (वय 37, रा दापोडी) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे त्यासोबत शशिकला विष्णू हसनाळे (वय 65), शेखर डहाके (वय 32), भामाबाई एकनाथ केळगंद्रे (वय 65) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शंकर भागोजी हवाले (वय 55, रा. उमापूर, ता. गेवराई, बीड) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकर यांची मुलगी आणि आरोपी संदीप यांचे 2007 साली लग्न झाले. लग्न झाल्यापासून पतीसह सासरच्या मंडळींनी विवाहितेकडे माहेरहून वारंवार पैसे आणण्याची मागणी केली. तसेच या कारणावरून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने 31 ऑगस्ट रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत आरोपींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.