Bhosari : चिटफंडच्या नावाखाली साडेसहा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – चिटफंडमध्ये पैसे गुंतवल्यास (Bhosari) चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून व्यावसायिकाकडून सहा लाख 60 हजार रुपये घेत त्यांची फसवणूक केली. हा प्रकार सन 2016 ते 2019 या कालावधीत इंद्रायणीनगर, भोसरी एमआयडीसी येथे घडला.

याप्रकरणी शिवजी देवजी पटेल (वय 55, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी शुक्रवारी (दि. 25) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार युवराज रणदिवे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhosari News : अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याची धमकी देणाऱ्या नातेवाईक तरुणावर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवराज हा मॅक्स केअर कुरीज इंडिया प्रा ली चिटफंडचा (Bhosari) मुख्य व्यवस्थापक आहे. त्याने फिर्यादिना चिटफंडच्या नावाखाली चांगल्या परताव्याचे आमिष दाखवले. सन 2016 ते सन 2019 या कालावधीत आरोपीने त्याच्या ऑफिसमधील मयूर या व्यक्तीकरवी फिर्यादीकडून 39 धनादेशांद्वारे सहा लाख 60 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन त्यांना कोणताही मोबदला न देता पैशाचा अपहार करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.