Bhosari : गदिमा जन्मशताब्दी सांगता सोहळा गुरुवारी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांची जन्मशताब्दी सांगता समारोह येत्या गुरुवारी 3 ऑक्टोंबरला सकाळी साडेनऊ वाजता भोसरी येथे महात्मा फुले विद्यालयाच्या सभागृहात होणार आहे. या समारंभात मुंबईचे ज्येष्ठ कवी अरुण म्हातज़े यांना गदिमा स्नेहबंध तर उद्योजक राजू देशपांडे यांना महाराष्ट्र उद्योगमूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, गदिमा प्रतिष्ठान, महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या सोहळ्याचे अध्यक्षपद महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी आणि स्वागताध्यक्षपदी नारायण सुर्वे अकादमीचे अध्यक्ष सुदाम ढोरे यांची निवड केली आहे. ज्येष्ठ साहित्यिक व माजी कुलगुरू डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले या सोहळ्याचे उद्घाटन करणार आहेत.

तुकाराम धांडे, भरत दौंडकर, नारायण पुरी, चंद्रकांत वानखेडे, संगीता झिंजूरके हे कवी काव्य मैफलीत सहभागी होणार आहेत. गदिमांची नात लीनता माडगूळकर-आंबेकर उपस्थित राहणार आहे. नगरचे शिक्षक असलेले कवी डो. अमोल बागुल यांचा विशेष सत्कार केला जाणार असून गदिमांचे वारसदार असलेले कवी काव्यवैफली सादर करणार आहेत. कवी पीतांबर लोहार यांच्या अध्यक्षतेखाली ही मैफील होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.