Bhosari : पत्नीने दगडाने ठेचले पतीचे बोट; आरोपी पत्नीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पती-पत्नीच्या भांडणात पत्नीने दगडाने पतीचे बोट ठेचले. बोटाची जखम गंभीर असल्याने बोट कापावे लागले. ही धक्‍कादायक घटना भोसरी येथे घडली.

मंगला प्रल्हाद जगदाळे (वय 55, रा. हनुमान कॉलनी, चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पत्नीचे नाव आहे. प्रल्हाद शंकरराव जगदाळे (वय 65) असे जखमी पतीचे नाव असून त्यांनी शनिवारी (दि. 19) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.17) रात्री दहा वाजताच्या सुमारास आरोपी मंगला आणि फिर्यादी प्रल्हा यांच्यात भांडण झाले. त्यावेळी मंगला यांनी “तू घरात राहू नकोस’, असे म्हणत प्रल्हाद यांना प्रथम झाडूने आणि नंतर दगडाने बोटांना मारहाण केली. या मारहाणीत बोटांना गंभीर जखम झाल्याने त्यांचे बोट कापून टाकावे लागले. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.