Akurdi : पत्रा उचकटून दुकानात चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – दुकानाचा पत्रा उचकटून चोरट्यांनी 28 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना आकुर्डी येथे शनिवारी (दि. 19) पहाटे उघडकीस आली.

जितू दिलीपकुमार गंभाणी (वय 35, रा. वैभवनगर, पिंपरी वाघेरे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गंभाणी यांचे अंबिका कलेक्‍शन नावाचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे गंभाणी यांनी आपले दुकान बंद केले. मध्यरात्री पावणे एक ते सव्वातीन वाजताच्या सुमारास आरोपीने दुकानाचा पत्रा उचकटून आतील जीन्स पॅन्ट, शर्ट, रोख रक्‍कम, मोबाईल व हेडफोन असा 28 हजार 40 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

तसेच चोरट्यांनी प्राधिकरण, निगडी येथील आर. के. इलेक्‍ट्रॉनिक्‍स या दुकानातही चोरी केली. याबाबत अधिक तपास उपनिरीक्षक रघुनंदन भोये करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.