Bhosari : भोसरीत जागर आदिशक्तीचा – सन्मान नारीशक्तीचा

भोसरीत महिला मेळावा

एमपीसी  न्यूज – नवरात्रीच्या निमित्ताने नुकताच नगरसेविका प्रियांका प्रविण बारसे यांनी गवळीनगर भोसरी येथे भाजपच्या वतीने महिला मेळावा घेतला.  या महिला मेळाव्यात विविध क्षेत्रात कार्य करणा-या महिलांचा सत्कार करण्यात आला. 

भोसरी गवळीनगर येथे झालेल्या या स्त्री शक्तीची जाणीव करून देणार्‍या कार्यक्रमात प्रियांका प्रविण बारसे, पिंपरी-चिंचवड भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा शैला मोळक, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप महिला प्रदेश महाराष्ट्र सचिव ज्योती जाधव होत्या.

यावेळी ज्योती जाधव म्हणाल्या, महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे.

विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला. त्यात    गीता पवार – आदर्श माता 2.  पूनम ओव्हाळ – सामाजिक कार्यकर्त्या, 3.  मीरा कोठमारे – महिला कीर्तनकार, 4. जयश्री अब्राहम -स्कूल बस चालक, 5.   कृतिका पिल्ले – राज्यस्तरीय कराटे खेळाडू, 6. कु. पुजा आखडे – मेकॅनिकल इंजिनियर, 7.  सुकन्या कापसे -डॉक्टर यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रियंका बारसे यांनी केले. सूत्रसंचालन वंदना आरोटे यांनी केले.  तर अनुराधा दौंड यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.