Bhosari : दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये पार्क केलेली कार चोरणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – दुरुस्तीसाठी गॅरेज मध्ये पार्क केलेली कार चोरणाऱ्याला (Bhosari) एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. हा सारा प्रकार 10 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत एमआयडीसी भोसरी येथील केजीएन मोटर गॅरेज येथे घडला.

मोसिन हुसेन मुलानी (वय 36 रा. पिंपळे गुरव) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शिवानंद विजयकुमार हरवाळ (वय 32 रा. निगडी )यांनी गुरुवारी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Dighi : घरखर्चाला पैसे न दिल्याने पतीचा खून; पत्नीला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी यांनी त्यांची ह्युंडाई कंपनीची ॲक्सेट ही 3 लाख 50 हजार रुपयांची कार दुरुस्तीसाठी लांडेवाडी येथील केजीएन मोटर गॅरेज येथे पार केली होती. यावेळी आरोपीने लबाडीने त्यांची कार चोरून नेली होती. मात्र पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली असून एमआयडीसी भोसरी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.