Bhosari News: जनसंपर्क कार्यालयासमोरून नगरसेवकाची दुचाकी चोरीला

वाहनचोरट्यांनी शहरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. भोसरी येथे चक्क नगरसेवकाची दुचाकी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोरून चोरून नेण्याचे धाडस चोरट्यांनी केले आहे.

एमपीसी न्यूज – वाहनचोरट्यांनी शहरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. भोसरी येथे चक्क नगरसेवकाची दुचाकी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोरून चोरून नेण्याचे धाडस चोरट्यांनी केले आहे. हा प्रकार 4 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता नगरसेवक राजू बनसोडे यांच्या दापोडी येथील जनसंपर्क कार्यालयासमोर उघडकीस आली.

नगरसेवक राजू विश्वनाथ बनसोडे (वय 40, रा. सीएमई गेट समोर, जाधव चाळ, दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरसेवक बनसोडे यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी (एमएच 14 ईजे 9366) पुणे-मुंबई महामार्गावर सीएमई गेटसमोर असलेल्या जनसंपर्क कार्यालयासमोर 3 सप्टेंबर रोजी द्पारी साडेतीन वाजता पार्क केली.

अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लॉक उघडून दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 4 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता उघडकीस आला. याबाबत 9 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदिरानगर झोपडपट्टी, चिंचवड येथून राजकुमार श्रीमंत केंगार (वय 35, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, चिंचवड) यांची 25 हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर (एमएच 12 एलडब्ल्यू 2161) चोरीला गेली आहे. ही घटना 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा ते 8 सप्टेंबर रोजी सकाळी सात या कालावधीत घडली आहे. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

माण गाव येथील चांदेनांदे फाटा येथून प्रवीण पारखी चाळीत घरासमोर पार्क केलेली एचएफ डिलक्स दुचाकी (एमएच 15 ईके 3314) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याबाबत विकास नारायण शिंदे (वय 32) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.