Bhosari News : PMPML च्या भोसरी आगारातील वाहकाचा प्रामाणिकपणा, प्रवाशाचे विसरलेले पैशाचे पाकिट केले परत

एमपीसी न्यूज – PMPML च्या भोसरी आगारातील वाहकाने प्रामाणिकपणा दाखवत, बसमध्ये विसरलेले प्रवाशाचे पाकिट परत केले आहे. या पाकिटात 1,500 रुपये रोख रक्कम, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र अशी महत्वाची कागदपत्रे होती. मंगळवारी (दि.26) भोसरी ते कात्रज या मार्गावरील PMPML च्या बसमध्ये हा प्रकार घडला.

गणपत तुकाराम भोसले असे या वाहकाचे नाव आहे. तर, आदर्श पकोळे असे या पाकिट परत मिळालेल्या प्रवाशाचे नाव आहे.

प्रवाशी आदर्श पकोळे यांनी वाहक भोसले व स्टार्टर मांगडे यांचे त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक केले. कात्रज आगार व्यवस्थापक विजय रांजणे यांनीही वाहक भोसले यांचे कौतुक करून पीएमपीएमएलच्या अशा प्रामाणिक सेवकांमुळे पीएमपीएमएलचा नावलौकिक व विश्वासाहर्ता वाढते, असे मत व्यक्त केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.