Bhosari : झाड तोडण्याच्या कारणावरून भांडण; महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – झाड तोडण्याच्या कारणावरून भांडण झाले. यात एकाने तिघांना मारहाण करत एका महिलेचा विनयभंग केला. ही घटना मंगळवारी (दि. 5) सकाळी 11 वाजता फुगेवाडी येथे घडली.

अनिल कदम कांबळे (रा. आनंदवन, फुगेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या वडिलांचे आणि आरोपी यांचे झाड तोडण्याच्या कारणावरून भांडण झाले. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी गेल्या असता आरोपीने फिर्यादी यांच्याशी गैरवर्तन करतात त्यांचा विनयभंग केला.

तसेच आरोपीने फिर्यादी यांच्या वडिलांना, आईला आणि भावाला हाताने मारहाण करून जखमी केले. तसेच बघून घेण्याची धमकी दिली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.