Bhosari : तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Suicide by strangulation of a young man

एमपीसी न्यूज – राहत्या घरात गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. 24) सकाळी लांडेवाडी, भोसरी येथे उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

विनोद विश्‍वंभर भालेराव (वय 30 रा. आंबेडकर नगर, लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद याचा घटस्फोट झालेला होता. तसेच तो गवळीमाथा येथील एका खासगी कंपनीत कामाला होता. मंगळवारी रात्री विनोदचे कुटुंबीय जेवण झाल्यानंतर झोपी गेले.

रात्री विनोदने धोतराच्या साहाय्याने छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेतला.

बुधवारी सकाळी आठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.